जळगाव ( प्रतिनिधी ) – नारीशक्तीच्या सदस्यांनी आज शहरातील एका बेघर व्यक्तीला निवारा मिळवून देत त्याच्या कायम निवासासह जेवणाची व्यवस्था करून दिली .
वाल्मिकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लेंडीनाला पुलावर एक व्यक्ती काही दिवसांपासून वास्तव्यास आहे तो दुपारच्या उन्हातदेखील त्याच पुलावर बसून असतो आणि उघड्यावरच उकिरड्याजवळ झोपतो कुणी काही खायला दिले तर कधी खातो कधी खात नाही त्याची मदत करता येईल का अशी माहिती राहुल सोनवणे यांनी वन्यजीव संस्थेच्या बाळकृष्ण देवरे याना दिली . सदस्य घटनास्थळी पोचले त्याला खायला दिले तरी त्याने काहीच खाल्ले नाही त्याच्या निवार्याची सोय कुठे करता येईल म्हणून प्रयत्न सुरू असताना देवरे यांनी सेवधर्म गृपवर पोस्ट टाकून या व्यक्तीला निवारा मिळवून देण्यासाठी सहकार्य मागितले
त्यावर नारीशक्ती बहुद्देशीय गृपच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी सहमती दर्शवत सकाळी लवकर व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले, त्यांनी सकाळी 7:30 वाजताच देवरे यांना सोबत घेत त्याला गाठले . वेळ न दवडवता मनीषा पाटील यांनी त्या व्यक्तीला बेघर निवारा केंद्रात हलवण्यासाठी काही रिक्षा चालकांना विनंती केली परंतु माणुसकीशून्य चालकांनी त्यांना नकार दिला,
एक माल वाहतूक करणारा आटोचालक संदीप कोळी रस्त्याने जात असताना त्याने पुलावर बेघर व्यक्तीला मदत करतांना सेवधर्मच्या मनिषा पाटील आणि सदस्यांना बघितले तात्काळ त्यांच्या मदतीसाठी आला त्यानेही आपले दोन सहकारी दुर्गेश बाविस्कर आणि पवन सपकाळे यांना बोलवले सर्वांच्या सहकार्याने त्या बेघर व्यक्तीला निवारा केंद्रात स्थान मिळाले
बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी , काळजी वाहक दीपक चौधरी या सर्वांचे सहकार्य घेत त्याची अंघोळ घातली दाढी कटिंग करून त्याला स्वच्छ केले त्यानंतर बेघर निवारा केंद्रातर्फे त्याला नवीन कपडे उपलब्ध करून दिले त्याच्यासाठी जेवण आणले स्वतःची बदललेली परिस्थिती आणि रूप बघून त्यालादेखील हुरूप आला आणि काहीच न खाणाऱ्या या व्यक्तीने पोटभर जेवण करत तृप्तीचा ढेकर दिला त्याची पूर्ण व्यवस्था करून मनीषा पाटील माघारी परतल्या ….