जळगाव ( प्रतिनिधी ) – युवासेना जळगाव महानगरतर्फे शहरातील २८ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा संघटक राधेशाम कोगटा, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, विक्रम पाटील, जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, किरण भावसार, सागर हिवराळे, चेतन कापसे, अमोल मोरे, प्रीतम शिंदे, प्रशांत फाळके, विजय लाड, कुंदन पाटील, शंतनू नारखेडे, आदी युवासैनिक उपस्थित होते.