जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोलीतील ( प्र न ) स्वामी समर्थ केंद्रात ( जळके रोड ) गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आज आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात १० डॉक्टरांनी ६०० रुग्णांची तपासणी केली .
श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी राजेंद्र आंबटकर , रत्ना आंबटकर , मंगलाबाई मराठे , शिवाजी पाटील , मोरे सर , उषाबाई पाटील , अर्जुन माळी , आदींनी या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .