अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील आमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयाच्या गच्चीवरील खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत २० हजार रूपये किंमतीच्या केबल वायर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारवड पोलीसांनी दिलेली माहिती वरून, अमळनेर तालुक्यातील आमळगाव येथे बीएसएनएल कार्यालय आहे. या ठिकाणी कार्यालयातील एका खोली बीएसएनएल यांच्या मालकीच्या केबल वायर ठेवण्यात आलेल्या आहे. १९ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खोलीचे बंद दरवाजा उघडून आत प्रवेश करत सुमारे २० हजार रूपये किंमतीच्या केबलची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उपमंडळ अभियंता पंकज रायसिघानी यांनी मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.