जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा भागातील रोहिणी ब्युटी पार्लर , सायली कॉस्मेटिक्स आणि सरकारच्या आत्मनिर्भर महिला स्वयंरोजगार योजना यांचा संयुक्त विद्यमाने आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप करण्यात आले . विविध २० उत्पादनांचा या किटमध्ये समावेश आहे

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे , नगरसेविका शोभा बारी , नगरसेवक विजय पाटील , नितुबाई परदेशी , शक्ती महाजन , शुभांगी बिर्हाडे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत रोहिणी ब्युटी पार्लरच्या संचालिका रोहिणी घायदार यांनी केले . आमदार राजूमामा भोळे यांनी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करीत सरकारच्या योजनांची माहिती दिली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राजक्ता कुंवर , भाग्यश्री घोडके , वृषाली साळवी , साक्षी कोळी , दिव्या कुंभार , पूजा महाजन , रुपाली चव्हाण यांनी परिश्रम घेतले.







