• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अर्धवट जळालेल्या ३ लाख ७५ हजारांच्या नोटा बदलून मिळाल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

रिझर्व्ह बँकेकडे आमदार चव्हाण यांचा ५ महिने पाठपुरावा

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – राखेतून पुन्हा झेप घेणाऱ्या फिनिक्‍स पक्षासारखी जिद्द न सोडता प्रदीर्घ पाठपुरावा करून आगीत राख झालेल्या ३ लाखांहून अधिक किंमतीच्या नोटा बदलून मिळवून देत आमदारांनी फाटक्या संसाराला आधार देण्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे.

काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील रोख रक्कम जवळपास ७ लाख ७० हजार रुपये व दागिने खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेने केशव महाजन यांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेल्या संसाराची राख झाली. या आगीत त्यांच्याकडे ३ लाख ७५ हजारांच्या अर्धवट जळालेल्या नोटाच शिल्लक होत्या.

आमदार मंगेश चव्हाण यांना याबाबत कळताच यांनी २८ फेब्रुवारीरोजी पोहरे येथे केशव महाजन यांची भेट घेतली नुकसानीची पाहणी केली. नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेली व्यथा पाहून आमदार मंगेश चव्हाण यांचे संवेदनशील मन हळहळले. आमदार चव्हाण यांनी अर्धवट जळालेल्या नोटा मी स्वतः रिझर्व्ह बँक येथे घेऊन जाऊन बदलवून आणेल असे सांगत त्या नोटा ताब्यात घेतल्या.

आमदार मंगेश चव्हाण यांनी मुंबई येथे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून घटनेची माहिती दिली सदर व्यक्तीला कशी मदत करता येईल अशी विचारणा केली. त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुमचा जळगाव जिल्हा हा रिझर्व्ह बँकेच्या नाशिक डिव्हिजन मध्ये येतो आणि त्याचे मुख्यालय नागपूर असल्याने आपल्याला तिथेच मदत मिळेल त्यावेळी आमदार चव्हाण यांनी स्विय्य सहाय्यकाला नागपूर येथे जळालेल्या नोटा घेऊन पाठवले. त्यावेळी नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, संबंधित शेतकरी यांचे बँक डीटेल्स व ओळखीचे कागदपत्रे आम्हाला द्या, त्यानंतर आमची कमिटी स्थापन होईल, ती अर्जाची खातरजमा करून नंतरजळालेल्या नोटांच्या बदल्यात किती टक्के रक्कम परत द्यायची हे ठरवते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यलयामार्फ़त प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सातत्याने नागपूर येथील रिझर्व्ह बँकेत पाठपुरावा केला दोनवेळा मुंबई येथून नागपूरला आपल्या स्विय्य सहाय्यकाला पाठवून वेळोवेळी संबंधित अधिकारी यांची भेट देखील घेतली काही दिवसांपूर्वी पोहरे येथील शेतकरी केशव माळी यांच्या खात्यात रिझर्व्ह बँकेतर्फे ३ लाख रुपये जमा झाले व आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला. केशव माळी यांच्या खात्यात पैसे जमा होऊनही त्यांना कल्पना नव्हती, आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातून त्यांना याबाबत विचारणा झाली तेव्हा त्यांनी बँकेत जाऊन खाते तपासले त्यांना त्यात ३ लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडून जमा झाल्याचे लक्षात आले. अडचणीच्या काळात आमदार मंगेश देवासारखे धावून आले नाहीतर आम्हाला यासाठी खूप फिरफिर करावी लागली असती अशी भावना केशव माळी यांनी बोलून दाखवली.

एखादी दुर्घटना झाल्यानंतर अनेकदा राजकीय व्यक्ति भेट देऊन आश्वासन देतात, दोन चार दिवस माध्यमात चर्चा होते मात्र त्यानंतर संबंधिताला मदत मिळाली की नाही याचा पाठपुरावा फारसा होत नाही. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी केवळ आश्वासनच दिले नाही तर नागपूरपर्यंत पाठपुरावा केला. रिझर्व्ह बँकेची क्लिष्ट प्रक्रिया असूनही जिद्द सोडली नाही व थेट मदतच मिळवून आणल्याने एक सच्चा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी केशव माळी यांना केलेल्या मदतीबद्दल पोहरेचे सरपंच काकासाहेब माळी, भाजपा बुथप्रमुख पंजाबराव अहिरराव, मोहन जाने, नाना साबळे, महारु महाजन, गोकुळ माळी, प्रकाश बागुल, सुरेश महाजन, राजू माळी, रावसाहेब माळी, सोमनाथ माळी, रामदास जाने यांच्यासह ग्रामस्थ, माळी समाज यांनी आभार मानले आहेत.


 

Tags: #chalisgaon aa.mangesh chawan sir #maharashtra #bharat
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Next Post

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची पारोळ्यात सहविचार सभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची पारोळ्यात सहविचार सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon