चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पिलखोड शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .
पिलखोड शिवारातील या अपघातात ठार झालेल्या या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनीं केले आहे . आज सकाळी 5 वाजता वामन पाटील यांच्या शेताजवळ परिसरातील लोकांच्या निदर्शनास ही दुर्घटना आली . अज्ञात वाहन फरार झाले आहे पीलखोड येथील पोलीस पाटील व मेहूनबारे पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.