पारोळा (प्रतिनिधी) – आरोग्य सभापती नवल चौधरी (भारतीय जनता पार्टी) यांची निवड बिनविरोध करण्यात आली सूचक दिपक अनुष्ठान ,अनुमोदन छाया पाटील, सदस्य मोनाली पाटिल, महिलाबाल कल्याण सभापती अंजली पाटील , (भारतीय जनता पार्टी )सूचक प्रदीप गुलाबराव पाटील, अनुमोन वर्षा पाटिल, बांधकाम सभापती रेखाबाई चौधरी (भारतीय जनता पार्टी ) सूचक मंगेश तांबे, अनुमोदन अलका महाजन, पाणीपुरवठा सभापती वैशाली संजय पाटील (शिवसेना) सूचक बापू महाजन, अनुमोदन जयश्री बडगुजर हे होते.


यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक प्रक्रिया ही वि सी द्वारे घेण्यात आली. यावेळी नगरसेवक दीपक अनुष्ठान, प्रदीप गुलाबराव पाटिल, मंगेश तांबे, छाया पाटील, मनीष पाटील, प्रकाश महाजन, बापू महाजन, सुनीता शिरोळे, जयश्री बडगुजर, कैलास चौधरी , नगरसेवक हजर होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावंदे, मुख्याधिकारी ज्योती भगत, संघमित्रा संदनशिव ,लिपिक सुभाष थोरात व कर्मचारी उपस्थित होते. सर्व नूतन सभापतीचे लोक नियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले.







