पाचोरा (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणारे वडगाव टेक ग्रामपंचायतीत ७ पैकी ७ जागा जिंकुन प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडविला आहे.


बांबरुड – कुरंगी गटाचे जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुषण प्रभाकर पाटील, दामिनी विजय पाटील, ललिता भगवान पाटील, सोनल योगेश कुमावत, रमेश शांताराम पाटील, मंगलाबाई सुरसिंग भिल, भिमा सोमा भिल हे ७ सदस्य निवडून आले आहेत. निवडुन आलेल्या सदस्यांचे व जि. प. सदस्य पदमसिंग (बापु) पाटील यांचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी अभिनंदन केले आहे.







