पाचोरा ( प्रतिनिधी) – येथील रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन पाचोरा उदयनराजे भोसले समर्थ व छत्रपती शिवाजी चौक उत्सव मंडळाने आज १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवारी रोजी शिवजयंती उत्सव निमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही गरजू रुग्णासाठी देण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात असल्याचे उदयनराजे भोसले समर्थकानी सांगितले.
रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले चार दिवस ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीत होते. रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करून त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि इतर तपासण्या सुद्धा करण्यात आले.१९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी शुक्रवारी दुपारपर्यंत ..हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे शिबीर घेण्यात आले असून आधी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून पुष्पहार घालून छत्रपती शिवाज महाराष्ट्र की जय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणानी कार्यक्रमाची सुरुवात केली.शिबिराचे आयोजक उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपचे सचिन पाटील, विशाल परदेशी, रवी ठाकूर, धीरज खूषव्हा, अनिल भोई, गोपाल पाटील, भीमा जाधव, वाय डी पाटील, श्याम पाटील, नितीन पाटील, सुनील पाटील, गणेश भोसले, समाधान पाटील, अमृत पाटील, कपिल जाधव, ज्ञानेश्वर महाजन, पत्रकार गणेश शिंदे यांनी केले होते.
या शिबिरात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. किशोर पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस विभागीय उपअधीक्षक श्री. काकडे पोलीस निरीक्षक नजन पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपनगध्यक्ष शरद पाटे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ भूषण मगर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ स्वप्नील पाटील, नगरसेवक विकास पाटील, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष गणेश शिंदे राजे, संभाजी युवा फाऊंडेशनचे भूषण देशमुख, आधार वर्डचे प्रवीण पाटील, राहुल पाटील, संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जीभाऊ पाटील मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, एस. ऐ. पाटील, शिवर्षी हभप अनिल मराठे, जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष गोरख महाजन, वीर मराठा मावळा यांच्यासह सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जळगाव रेडकोस सोसायटीच्या रक्तपुरवठासाठी डॉ. एस. बी. सोनवणे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, महेश सोनगीरे, उमाकांत शिंपी, सौ. दिशा कांबळे यांनी नियोजन पाहिले, तर कार्यक्रमाचे आभार सचिन पाटील, रवी ठाकूर यांनी मानले आहेत.सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले.