डांभुर्णी ता.यावल (प्रतिनिधी) – येथुन जवळ असलेल्या निलान्स कंपनीच्या परीसरात आज दि.2 रोजी कोळन्हावी चोपडा महामार्गावरील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ शेतकर्यांच्या बांधालगत जिवंत पुरुष जातीचे गोंडस बाळ अज्ञात महीलेने फेकून पसार झालेची घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
या महामार्गावरील शेतात काही महीला शेत निंदणीचे काम करत असतांना एका महीलेने गवताचे ओझे बांधावर टाकण्यास गेली आसता तेथे लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने ती घाबरुन महीलांकडे पळाली या बाबत सखोल माहीती साठी सर्व महीला एकवटून त्या आवाजाच्या दिशेने गेले असता त्या ठिकाणी त्यांना कापडात गुंढाळुन बेवारस पडलेले पुरूष जातीचे जिवंत बाळ नीदर्शनास आले. याबाबत त्या महीलांनी तातडीने पोलिस पाटलांशी संपर्क साधुन त्या बाळाला पोलिस पाटलाच्या स्वाधीन केले.पाटलांसह अनेकांनी बाळाला पाहण्यासाठी गर्दी केली. डांभुर्णी येथील उपकेंद्रात असलेले वैद्यकीय आधिकारी सोनल चौधरी व डॉ.प्रशांत भंगाळे यांनी बाळाची तपासणी केली आसता बाळाचे वजन 2 किलो 10 ग्रम वजन असून बाळ पुर्ण दिवसांचे आसल्याचे सांगण्यात आले. यात विशेषतः बाळाचा जन्मा हा दोन-तीन तासापुर्वीच झाला असावा असा प्राथमिक अंदाजही लावण्यात आला. त्यामुळे हे बाळ पुरूष जातीचे असुनही फेकले कुणी? ती महीला कोण?असे तर्क वितर्क परीसरात लावले जात आहे.त्या जिवंत बाळाला घेऊन पो.पाटील व सहकारी यांनी ग्रामीण रुग्णालय यावल येथे जाऊन ते बाळ पोलीसांच्या स्वाधीन केले. याबाबत यावल पोलीसांशी संपर्क साधला असता बाळाची तपासणी करुन त्याला जळगाव येथे घेऊन जाणार आसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर या बाबत यावल पोलीस स्टेशनला किरण भास्कर कचरे पोलीस पाटील डांभूर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.








