• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आपला सांस्कृतिक पारंपरिक वेश सांभाळणे, जतन करणे खूप मोठी बाब

हभप चारुदत्त आफळे महाराज यांचे प्रतिपादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2023
in Uncategorized
0

“श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” अंतर्गत उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – पौरोहित्य् करणाऱ्या ब्राह्मणाप्रती तरुण वर्गात् आदर निर्माण केला पाहिजे. तसेच, पारंपारिक वेश सांभाळणे खूप मोठी बाब आहे. तरूण पिढीला हे शिकविले पाहीजे, ब्राह्मण समाजाला संघटन करून ते कायमस्वरूपी टिकवावे लागेल,असे प्रतिपादन हभप चारुदत्त आफळे महाराज यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी “आजचा ब्राह्मण समाज, दशा व दिशा” या विषयी हभप चारुदत्त आफळे महाराज यांचे व्याख्यान संध्याकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहमध्ये आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून अविनाश नांदेडकर, श्रीराम खटोड, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, महिला मंडळ अध्यक्षा मनीषा दायमा मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रस्तावनेतून श्रीकांत खटोड यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देऊन, समाजबांधवांच्या प्रबोधनाच्या उद्देशाने व्याख्यान आयोजित केल्याचे सांगितले. डॉ. अजित नांदेडकर यांनी, बहुभाषिक ब्राह्मण संघाविषयी माहिती दिली. प्रसंगी परशुराम सेवा समितीचे देणगीदार, परशुराम सेवक व परशुराम दूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

चारुदत्त आफळे यांनी सांगितले की, समाज बांधवांनी आपल्या कुटुंबाचे हित कशात आहे याचा विचार सातत्याने केला पाहिजे. कुटुंबातील तरुण पिढी आपल्या इतिहासाचे जतन कसे करेल तसेच कुटुंबहित व देशहित लक्षात घेऊन त्या दृष्टीने कसे कार्य करता येईल यासाठी तरुण पिढीला सतत मार्गदर्शन केले पाहिजे.

प्रत्येक घराघरांमध्ये रामरक्षा म्हटली गेली पाहिजे. या विश्वातील सर्व दैवते मंत्राधीन आहेत. ही मन्त्रे ब्राह्मणांकडे आहे. आपण परमार्थ करण्यात आपले सामूहिक प्रयत्न कमी पडत आहेत. हे सामूहिक प्रयत्न वाढवले पाहिजे असेही ते म्हणाले. ब्राह्मण समाजाचे संघटन अनेक वेळा खूप झाले, मात्र संघर्ष अनेकदा कमी पडले. संघर्ष करण्यात आपण कमी पडू नये असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन अमोल जोशी, पल्लवी कुलकर्णी, मंजुषा अडावदकर यांनी केले. आभार स्वाती कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळी कलादर्शन
गुरुवार २० एप्रिल रोजी सर्वप्रथम सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजी नाट्यगृहात उदयोन्मुख युवा तरुणांचे कला सादरीकरण सादर झाले. यावेळी सौरभ चौबे, राहुल दायमा, आनंद दशपुत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समाजातील १५ तरुणांनी गायन, वादन सादर केले. यात भक्तिगीते व चित्रपटातील गीतांचाही समावेश होता. युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कलागुणांचे सादरीकरण केले. प्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 

Tags: #bramhan sangh jalgaon newshttps://kesariraj.com/20-april-23-n-10/
Previous Post

सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

Next Post

तडीपार गुन्हेगाराकडून असोद्यामध्ये मध्यरात्री गोळीबार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तडीपार गुन्हेगाराकडून असोद्यामध्ये मध्यरात्री गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon