मुंबई (वृत्तसंस्था) – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून विशेषकरून राणे कुटुंबाकडून सतत प्रहार होताना दिसत असतो. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आम्ही घेतलं नाही असं काही दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.मात्र निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचं थेट नाव घेत त्यांच्यावर आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी आपल्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याच्या बातम्या आल्या होत्या,त्यावरूनचं आदित्य ठाकरे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार का या चर्चांना उधाण आले होते. मात्र शिवसेनेने या सर्व बातम्याचं खंडण करतं त्यांच्या बायोमध्ये आधीपासुनचं मंत्रिपदाचा उल्लेख नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की , ‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.’







