पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे गुरे चारनारे गुराखी हे सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात. आणि त्यांची जनावरे रस्त्यावर मोकाट पणे सोडून देतात. अशा कृत्यामळे रस्त्यावर वाहने चालवणे जिकिरीचे होत असल्यामूळे बऱ्याच वाहन चालकांना अपघातास समोरे जावे लागत असुन मोठ्या दुर्घटनेचा सामना करून जिव गमवावा लागतो.

त्यावेळेस अशा गुरे चारणाऱ्या गुराखींना गुरे रस्त्याच्या कडेला करण्याचे सांगितल्यास तो गुराखी वाहन धारकांना बजावुन सांगतो तुम्ही वाहनाच्या खाली उतरुन स्व:ता बाजुला हाकलुन द्या. अशा उर्मट भाषेत बोलून शिवीगाळ करून हाणामारी करतात. यामूळे त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्यास कोणीही टाळू शकत नाही. वरिल सर्व गंभीर प्रकरणाला आळा बसेल त्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी जिल्ह्यात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेवुन जिल्ह्यातील पोलिस पाटील यांचे मार्फत सर्व गुरे मालकांना तसेच गुरे चारणाऱ्या गुराखींना प्रत्येक ग्रामीण भागात सुचना देण्यात याव्यात. त्यांनतर जो गुरे मालक तसेच गुरे चारणारे गुराखी रहदारीच्या रस्त्यावर मोकाट पणे गुरे ठेवून रहदारीस अडथळा निर्माण करतील अशा मालकांवर आणि गुरे चारणाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशा कार्यवाहीमुळे निष्पाप लोकांना जिव मुकावा लागणार नाही. अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केली आहे.







