कोलकाता (वृत्तसंस्था) – देशामध्ये झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे कल आता जवळजवळ हाती आले आहेत.सर्वात जास्त चर्चेच ठरलेले राज्य ते म्हणजे पश्चिम बंगाल.ममता बॅनर्जी विरूद्ध मोदी-शाह यांच्या या लढतीत ममता दिदिंनी मोदी-शहांना धूळ चारली आहे.200 पेक्षा जास्त जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस ला यश मिळत आहे.

दुसरीकडे ममता बॅनर्जी या लढवत असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात ममता बॅनर्जी यांनी एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी जवळपास 1200 मतांनी पराभव केला आहे.त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा करिश्मा पाहायला मिळाला आहे.







