जळगांव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील व शहरातील सुमारे 25 तरुणांनी बेरोजगारी व महागाईला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या नेतृत्वात व कुंसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे यांच्यावर विश्वास ठेवून आज या सर्व तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रदीपराव पवार, सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे , ज्ञानेश्वर कोळी , राजेंद्र पाटील, आशुतोष पवार, रविंद्र भंगाळे आदी उपस्थित होते.