पारोळा ( प्रतिनिधी ) – येथे मनसेकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले.
पारोळा येथे काल माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी प्राचार्य लक्ष्मण चव्हाण, बालाजी शाळेचे नितीन जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण, तालुका अध्यक्ष वसंत पवार , शहर सचिव हर्षल वाघ, शरद पाटील, अविनाश पवार, रंगराव पवार, मयूर वाघ, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.