चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – निर्दयतेने कोंबून गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलसांनी पकडन चार गुरांची सुटका केली मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बारी येथील शाळेच्या जवळून निर्दयतेने चार बैलांची वाहतूक वाहनातून होत असल्याची गोपनिय माहिती मेहुणबारे पोलीसांना मिळाली. पोलीसांनी १ जुलै रोजी कारवाई करत सायंकाळी (एमएच १५ एफव्ही १४१) क्रमांकाचे वाहन पोलीसांनी अडविले. त्यांनी वाहतूकीबाबत परवाना विचारले असता. त्यांच्याकडे वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. वाहन जप्त करून चारही बैलांची सुटका करण्यात आली विकास सुधाकर गोमसाळे ( रा. साक्री रोड धुळे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश महारू चौधरी ( रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव) आणि अमजद खान खालक खान कुरेशी ( रा. चौधरीवाडा चाळीसगाव ) या दोघांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना प्रतापसिंग मथुरे करीत आहेत.