यावल ( प्रतिनिधी ) – फालक नगरातून ३४ वर्षीय तरूण घरात काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.मोहम्मद चांद शरीफ पटेल असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे.
मोहम्मद चांद शरीफ पटेल फालक नगरात पत्नी व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २५ जून रोजी सायंकाळी घरात काहीही न सांगता तो बेपत्ता झाला आहे. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी रेश्मा चांद पटेल यांनी त्यांचा शोध घेतला परंतू कुठेही शोध न लागल्याने त्यांनी सहा दिवसांनतर १ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना महेंद्र ठाकरे करीत आहेत.