जळगाव ( प्रतिनिधी ) – एसएमआयडी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
हेमंत गुलाब चौधरी (वय-३४ , रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ ) खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. २८ जूनरोजी दुपारी हेमंत चौधरी घरी असतांना त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरील अनोळखी व्यक्तीने तुम्ही लकी ड्रॉ म्हणून ९ लाख ५० हजार रूपये जिंकले आहे असे सांगून जीएसटी म्हणून ९ हजार ५०० रूपये खात्यात जमा करावे लागेल असे सांगितले. हेमंतने गुगलपे वरून राहूल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यान ९ हजार ५०० रूपये भरले. नंतर पुन्हा इनकम ट्रॅक्स म्हणून ३३ हजार ९५० रूपये भरायला सांगितले. त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले. परंतू लकी ड्रॉ चे पैसे आले नाही. यावरून आपली ४३ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी १ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहेत