जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात बुधवारी दिवसभरात २९३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले दुसरीकडे आज ४८८ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत . आज पाचोरा तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-४८, जळगाव ग्रामीण-४८, भुसावळ-२५, अमळनेर-३७, चोपडा-३७, पाचोरा-१८, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-८, एरंडोल-२, जामनेर-४१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-०, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २९३ बाधित रूग्ण आढळून आले आहेत .
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ८२२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४६ हजार १३१ रूग्ण बरे होवून घरी परतले आज पाचोरा तालुक्यातील एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ हजार ५८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.