जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंब्याचे सरपंच , ग्राम विकास अधिकाऱ्यावर १ लाख ६५ हजार रुपयांच्या अपहाराचा आरोप ग्रामस्थ आणि ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे .
तक्रारदारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , तालुक्यातील कुसुंबे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये चोंदाव्या वित्तीय आयोगाचा 1 लाख 6 5 हजारांचा निधी मंजूर होता. तो निधी जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्या संगनमताने काढण्यात आलेला आहे 31 मार्च रोजी मासिक मीटिंग झालेली होती तरी त्या मीटिंगमध्ये ग्राम विकास अधिकारी यांनी हे पैसे सरपंच यांच्याकडे आहे असे सांगितले होते त्यावर सरपंच यांनी त्यांना विरोध केला व हा निधी माझ्या सहीने काढण्यात आलेला नाही असे सांगितले त्यावरून निधीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याची कबुली ग्राम विकास अधिकारी यांनी व्हिडिओ क्लिप मध्ये दिलेली आहे व्हिडीओ क्लिप या अर्जाद्वारे सादर केली आहे.
31 मार्च 2022 रोजी मासिक मिटिंगमध्ये ७ ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी अर्ज केलेला होता त्या अर्जामध्ये ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांनी या घोटाळ्याची कबुली लेखी दिली आहे आम्ही आठ दिवसात हे पैसे देऊ असेही त्यांनी मान्य केले आहे
हा निधी शासनाचा असून सहा ते आठ महिने झाले हे पैसे बॅंकेतून काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्रेले आहे या घोटाळ्यांची चोकशी करण्यात यावी सन 2021 22 पर्यंतचे सर्व दप्तराची चोकशी करण्यात यावी कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर करण्यात यावी , अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे .
नंदिनी विजयसिंह पाटील , अश्विनी वाल्मीक पाटील , मिनाबाई अशोक पाटील , चंद्रकांत भावलाल पाटील ,श्रावण शेनपडु कोळी , रामदास मारुती कोळी. यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.