धरणगाव ( प्रतिनिधी ) – पाळधी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने ट्रक्टरला धडक दिली . या धडकेत दोन जण जखमी झाले . याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पारस पेट्रोल पंप आहे. या रोडवर (एमएच १८ बीए १८८) भरधाव ट्रकने ट्रक्टर (एमएच १९ सीव्ही ६६०४) व ट्राली क्रमांक (एमएच १९ एएन ७६२५) ला धडक दिली. कल्पेश सुधाकर शिंदे (वय-२६) आणि मयुर सुभाष पाटील ( दोन्ही रा. पोखरी ता.धरणगाव ) हे जखमी झाले धरणगाव पोलीस ठाण्यात कल्पेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक भटू मोतीलाल महाले ( रा. धुळे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहेत