जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तांबापुरा भागात पार्किंगला लावलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद लोटू पवार (वय-३९ , रा. रथ चौक, बारीवाडा, पिंप्राळा ) हे रिक्षाचालक असून त्यांच्याकडे (एमएच १९ बीयू ८६२३) क्रमांकांची बजाज थ्री व्हिलर रिक्षा आहे. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. ३० मार्चरोजी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे त्यांनी रिक्षा पार्किंग केली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ मार्च रोजी समोर आली. त्यांनी परिससरात शोधाशोध केली परंतु रिक्षा कुठेही आढळून आले नाही. अखेर शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इम्रान सय्यद करीत आहेत.