जळगाव ( प्रतिनिधी ) – अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी आठ हजाराची लाच घेताना बोदवडच्या तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत . त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. अवैध वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैश्यांची मागणी केली जात होती असे या प्रकरणात समोर आले आहे. वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीच्या पडताळणीसाठी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचला होता. यावेळी बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, त्यांचा वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.