रावेर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रावेर व सावद्यात अनेक मेडीकलांची रेमडीसीवीर संदर्भात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, यासाठी तहसिलदार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश्याची वाट बघावी लागली.

जिल्हाभरात रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यापर्यंत गेल्या नंतर आज रेमडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची तंबी देताच. स्थानिक महसूल प्रशासन खळबळुन जागी झाले व आज सूटीच्या दिवशी सावद्यासह रावेरच्या १९ मेडीकलची तपासणी करण्यात आली. यापैकी वल्लभ मेडिकल यांच्याकडे १२ रेमडीसीवीर स्टॉक उपलब्ध आहे. सर्व महत्त्वाच्या दुकानांची तपासणी करून रेमडीसीविरचा किती स्टॉक आहे याची माहिती म जिल्हाधिकारी यांचेकडे देण्यात आली. यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना साठा घेण्यासाठी कार्यान्वित करून माहिती प्राप्त करून घेतली.







