जळगाव (प्रतिनिधी) – छत्रपती ग्रुप म्हसावदकडून म्हसावद गावात छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनोज भाऊ पैलवान (नगरसेवक) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 30 जुलै गुरुवार रोजी म्हसावद गावात घरोघरी सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिक त्रस्त आहेत हा संसर्गा वाढू नये या उद्देशाने छत्रपती ग्रुप अनेक समाज उपयोगी कामे करत आहे नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता त्याचा सामना करावा व काळजी घ्यावी अशी ग्रुप मार्फत स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्यात येत आहे कोरोना चा संसर्ग वाढू नये म्हणून ग्रुप मार्फत ट्रॅक्टरने गावात घरोघरी जाऊन फवारणी करण्यात आली बाहेर येताना तोंडाला मास्क किंवा रुमाल लावावा व बाहेरून आल्यावर हात धुवावे असे पण स्वयंसेवक मार्फत सांगण्यात आले








