जळगाव (प्रतिनिधी)- जळगावातील खंडेराव नगर येथील एका महिलेच्या घरासमोर बांधलेली गाय कोणीतरी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंचल मानकुंमरे हे खंडेराव नगरात कुटूंबियांसह राहात असुन ९ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या मालकीची गाय ही घरासमोरून चोरून नेली. गेल्या दोन दिवसांपुर्वी गुरांची चोरून चोरटी वाहतूक करून पाळधी येथील कत्तलखान्यावर नेत असल्याची माहिती जिल्हा पोलीसांना मिळाली होती. त्यावेळी पोलीसांनी पाळधी येथील कत्तलखान्यावर धाड टाकून सुमारे २२ गुरांची सुटका केली होती. या सुटका केलेल्या गायींमध्ये चंचल मानकुंमरे यांची गाय होती.