जळगाव (प्रतिनिधी) – लेवा समाजातील मुली व महीलांच्या वक्तृत्व विकासासाठी “संस्कृती संस्कार” ही वक्तृत्व स्पर्धा सर्टिफकेट व आकर्षक बक्षीसासह ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीत आणि भारताच्या इतिहासात आणि आधुनिक काळात ज्यांची नावे सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेलेली आहेत अशी महान स्त्री चरित्रे
स्पर्धेचा व्हिडीओ बनवून आमच्याकडे पाठवायचा आहे. या स्पर्धेला लेवा समाजातील कुठूनही, कोणत्याही राज्यातून, देशातून लेवा समाजातील सर्व मुली व भगीनी भाग घेऊ शकतात आणि आपले वक्तृत्व मराठी , हिंदी ,आणि इंग्रजी भाषेतून सादर करू शकतात.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचावी व फॉर्म भरावा आणि ही माहिती आपल्या माहितीमधील लेवा समाजातील सर्व मुली व भगीनी किंवा त्यांच्या पालकांपर्यंत पोहाचवावी म्हणजे त्यांना सुध्दा त्यांचे वकृत्व गुण सदर करता येतील.असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/uJvjyzV4Xrs5H4Av7 अधिक माहितीसाठी खालील नंबर बर संपर्क करावा.
०२५७-२२३२२७५ आणि ०२५७-२२८२१४६ .







