जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियान महिला जिल्हा आघाडी अध्यक्षपदी पुष्पा रविंद्र पाटिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्य महामंत्री डॉ.मुकेश शर्मा, प्रदेशाध्यक्ष भगवान बागुल,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सुलोचना चौधरी यांनी पुष्पा पाटिल यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
पंतप्रधान जन कल्याणकारी योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाड़णार असल्याचे पुष्पा पाटील यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.