जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे रविवार दि. 20 रोजी “रोजगार दो मेळावा व मोटार सायकल रॅली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा दुपारी 1 वाजता काँग्रेस भवनात होणार आहे. त्यानंतर दुचाकी रॅली निघणार आहे.
या ” रोजगार दो ” मेळाव्यास युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रियंका सानप, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष उल्हास पाटील,आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक राजीव पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाष पाटील यांनी केले आहेत.