सुवर्णा लुल्हे हीचा वाढदिवस वंचितांना दिवाळी फराळ ,साडी वाटपाने साजरा

जळगाव (प्रतिनिधी) – ” परोपकाराचा नंदादीप सर्वांनी अखंड तेवत ठेवायला पाहिजे “असे प्रतिपादन साई समीक्षा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा रणरागिणी श्रीमती शीतल जडे यांनी केले.तरसोद शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या द्वितीय सुकन्या सुवर्णा लुल्हे यांच्या २३ व्या वाढदिवसानिमित्त झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीच्या औचित्याने दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजी सामाजिक उत्तरदायित्वाने ‘इको पॉलि प्लास्ट ‘ या तरसोद येथील चटई कंपनीतील पावरी व अन्य आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना त्यांच्या कुटुंबियांसह एकूण ५० व्यक्तींना लाडू ,शंकरपाळे,शेव चिवडा,चकल्या फराळ वाटप तसेच महिलांना साडी व सर्वांना मास्क वितरीत करून कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जडे बोलत होत्या.कार्यक्रमास प्रमुख अतिथी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,तरसोद गणपती देवस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त सुधाकर सोनवणे,माजी सरपंच सौ. मनीषाताई काळे,कर्तव्यदक्ष पोस्ट मास्तर सौ.ज्योतीताई पाटील,आत्माराम सावकारे, कलाशिक्षक सुनील दाभाडे मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवाळी फराळ देण्यात आला.महिलांना श्रीमती शीतल जडे यांच्या हस्ते साड्या,माजी सरपंच सौ.मनीषा ताई काळे यांच्या हस्ते बालकांना कपडे व पोस्ट मास्तर सौ .ज्योती ताई पाटील यांच्या हस्ते सर्वांना मास्क वाटप वितरीत करण्यात आले.असावा नगरच्या रस्त्याला उघड्यावर संसार थाटलेले पाथरवट रोहिदास धोत्रे यांच्या कुटुंबीयांना सुवर्णा लुल्हे व समीक्षा लुल्हे यांनी दिवाळी फराळ वाटप केला.याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार, श्री . गणेश दुग्धालयाचे संचालक मधुसूदन चौधरी,भोकर येथील रा.न.राठी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम चिंचाळे,रणजीत चौधरी,गणेश चौधरी उपस्थित होते.
त्यानंतर जळगाव येथील वीज वितरण कार्यालयाजवळील भिल्ल तांडा बेरोजगार वस्तीतील पन्नास बालकांना मानव सेवा विद्यालयाचे पुरस्कार प्राप्त आदर्श कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या हस्ते दिवाळी फराळ देण्यात आला.हरिविठ्ठल नगर भागातील भिलाटी वस्तीतील ५० बालकांना जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षालीताई पाटील व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे सचिव आबा माळी यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.मार्गदर्शनात हर्षाली ताई म्हणाल्या की,” भौतिक सत्ता संपत्तीचा घेतलेला वैयक्तिक उपभोग हा एका अर्थाने अखिल मानवतेवर आणि संस्कृतीवर केलेला अक्षम्य अत्याचारच आहे “.नेतकर साहेबांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘ इको पॉली प्लास्ट ‘कंपनीचे मालक नितेश जैन व पोलीस पाटील गोकुळ शिरुड यांचे मार्गदर्शन आणि कंपनीचे मॅनेजर सचिन शिरसाठ,कर्मचारी शंकर देवकर ,अशोक पवार यांचे अमूल्य सहकार्य मिळाले .







