पहूर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून जवळ असलेल्या मेणगाव गावातील गोविंदा महाजन यांच्या शेताच्या बांधावर सुरू असलेल्या झन्ना – मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून यात आरोपी रामसिंग सरीचंद राठोड, संतोष राठोड, भालचंद्र रूपचंद जाधव, गोपाल बाबुराव बारी या आरोपीला रंगेहात पकडून त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य तसेच सात हजार रुपये यावेळी जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींविरोधात पवार पोलीस ठाण्यात भादवि 301 /20 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, दिनेश लाडवंजारी, अनिल राठोड, श्रीराम धुमाळ, होमगार्ड जगदीश चौधरी या पथकाने ही कारवाई केली.








