जळगाव (प्रतिनिधी) – जळगावतील गणेश कॉलनी भागातील एटीएम फोडण्याचा चोराचा प्रयत्न आज सतर्क नागरिकांनी उधळून लावला .
शहरातील गणेश कॉलनी भागात विजय कॉलनीला लागून एच डी एफ सी बँकेचे एटीएम आहे. तेथे गॅस कटरच्या मदतीने तोडफोड करून रक्कम पळविण्याचा प्रयत्न आज एकाने केला . गॅस कटरच्या आवाजाने परिसरातील नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळावरून संशयित चोराला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले . जिल्हा पेठ पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही माहिती बँकेला कळविल्याचे सांगण्यात आले.








