वरणगाव ( प्रतिनिधी ) – वरणगाव शहरापासूनजवळ असलेल्या शेतशिवारातील विहिरीत बुडून अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वरणगाव शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. हा प्रकार वीटभट्टी काम करणारा मोहन कुंभार यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीला आला. या संदर्भात त्याने तातडीने परिसरातील नागरिकांना बोलवून घटनेची माहिती सांगितली तसेच वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील घटनांस्थळी दाखल झाले. ही महिला अनोळखी असून तिची ओळख पटण्याचे काम सुरू आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुकर भालशंकर करीत आहे.