जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रिंगरोड परिसरातील एका बँकजवळून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
हरिविठ्ठल नगरातील रहिवाशी सोमेश भटू कदम (वय-२५) हा तरुण १० मे रोजी जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील वैद्यनाथ सहकारी बँक परिसरात आला होता. त्याने दुपारी वैद्यनाथ बँकेजवळ सार्वजनिक जागी त्याची (एमएच १९ सीएच १०५०) या क्रमांकांची मोटारसायकल उभी केली. काम आटोपून परतल्यावर मोटारसायकल जागेवर दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेवूनही मोटारसायकल मिळून न आल्याने सात दिवसानंतर सोमेश कदम याने शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला पुढील तपास पो ना प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.