जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतातील ईलेक्ट्रिक डीपीवरून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीच्या ॲल्यूमिनीयम तारांची चोरी केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
, जळगाव तालुक्यातील लोणवाडी शिवारातील रविंद्र पोपट पाटील यांच्या शेतात महावितरण कंपनीची ईलेक्ट्रिक डी.पी. आहे. या डिपीवरून शेतकऱ्यांच्या विजपंपासाठी वीजपूरवठा केला जातो. महावितरण कंपनीने या ठिकाणी ठेवलेल्या ॲल्यूमिनीअमच्या १५ हजार रूपये किंमतीच्या तारांची चोरी केल्याचे १७ मे रोजी सकाळी उघडकीला आले
महावितरण कर्मचारी संतोष विठ्ठल पाटील ( रा. महाबळ जळगाव ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून १८ मे रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहेत