यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथे धोबीवाडा भागातील भांडी विक्रीचे दुकान उघडे असल्याचे पाहून अज्ञात चोरटयांनी संधी साधली. त्यांनी गल्ल्यातील २८ हजार रुपये लांबविले. प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफिक खान शफी खान (वय ५५, कुरेशी मोहल्ला, फैजपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. १६ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान फिर्यादीचे इंडिया स्टील दुकान उघडे होते. हीच संधी साधून अज्ञात चोरटयांनी दुकानात शिरून गल्ल्यातील २८ हजार २० रुपये चोरून नेले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून १८ रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना विशाल मोरे करीत आहे.