भडगाव (प्रतिनिधी) – येथील गंगाई इंडस्ट्रीज येथे चोरटयांनी चोरी करून १ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार अवधूत देशमुख (वय २८, रा.देशमुख वाडा, भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. १७ मे रोजी रात्री ८ वाजेपासून ते १८ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत कधीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या एमआयडीसी येथील गंगाई इंडस्ट्रीज येथे खिडकीचे कुलूप तोडून बांबूने दरवाजाची आतील कडी उघडली. आत शिरून त्यांनी कपाटातील लोखंडी लॉकरमध्ये तसेच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये चोरून नेले.
याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे १८ रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि चंद्रसेन पालकर करीत आहेत.