जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूणमधील मास्टर कॉलनी येथील ४४ वर्षीय व्यक्तीला मोटारसायकलचा धक्का लागल्याने रंगपंचमी खेळणारे १० ते १२ मुलांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासीम अब्दुल रहिम खाटीक हे मास्टर कॉलनी मदरसा येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी सायंकाळी मेहरूण येथील महादेव मंदिराजवळ महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून मोटारसायकलने जात असताना एकाला मोटारसायकलचा धक्का लागला. यावरून रंगपंचमी खेळणारे १० ते १२ अनोळखी मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत कासीम अब्दुल रहीम खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत