जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतनगर येथे मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावर आरोपीने मुलीसह तिच्या आईला दगडाने बेदम मारहाण केली . शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतनगर येथे आशाबाई बडगे मुलीसह वास्तव्यास अाहे. भारत नगरातच राहणार्या काही तरुणांनी आशाबाई यांच्या मुलीची छेड काढली होती. १६ मार्च रोजी आशाबाईनी त्याचा जाब विचारला असता तरूणांनी घरात घुसून आशाबाई व त्यांच्या मुलीला दगडाने मारहाण करून दुखापत केली इतरही दोन ते तीन जणांनी मारहाण केली. अशा आशयाच्या आशाबाई बडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी मोहन भालेराव, राजू भालेराव , यशवंत भालेराव, बळवंत भालेराव, समाधान भालेराव (पूर्ण नाव माहीत नाही) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.