जळगाव ( प्रतिनिधी ) – भांडण करू नका असे म्हणाल्याच्या रागातून तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
आकाश गोकूळ पारे (वय-२५ ) दत्त मंदीराजवळ, तुकारामवाडी येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हनुमान मंदीराजवळ गोल्या ठाकूर ( रा. जैनाबाद ) आणि विशाल चौधरी ( रा. शंकरराव नगर ) या दोघांचा वाद सुरू असतांना आकाश पारे हा तिथे आला व म्हणाली की, तुम्ही वाद का करता, या रागातून गोल्या ठाकूर याने त्याच्या कमरेला लावलेलेा कोयत्याने आकाशच्या डोक्यावर वार केले. आकाश गंभीर जखमी झाला. विशाल चौधरी याने शिवीगाळ करून मी तुला पाहून घेईन असा दम दिला. आकाश पारे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोल्या ठाकूर आणि विशाल चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहेत.