चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पत्नीने मद्यपान केल्यामुळे संतापलेल्या पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीची हत्या केल्याची थरारक घटना मेहूणबारे परिसरात घडली मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, मध्यप्रदेश) हे पत्नीसह सालदारीवर काम करण्यासाठी मार्च- २०२१ मध्ये मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात आले आहेत. त्याचठिकाणी एका शेडमध्ये वास्तव्यास आहेत. काल कुवरसिंग पावरा यांनी पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून पत्नीची हत्या केली. हि घटना १८ मार्च रोजी रात्री घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच मेहूणबारेचे सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटील, सुभाष पाटील, मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी पंचनामा केला पती कुवरसिंग यांना विचारपूस केली असता. त्यांनीच पत्नीची कुऱ्हाड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली. त्याला मेहूणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.