युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे
जळगाव ( प्रतिनिधी ) – आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदे राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज विजय नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड नुकतीच मुंबई येथे मुख्य कार्यालयात करण्यात आली.
डॉ.सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करीत आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषद राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड झाल्याचे घोषीत केले.
राष्ट्रीय बोर्डाने नारखेडे यांच्याकडून महाराष्ट्रातील मानवाधिकार संदर्भातील विविध घटनात्मक बाबींचा अभ्यास करून त्यासंदर्भात कार्य करण्याची आशा व्यक्त केली. ही निवड सुरज नारखेडे यांची समाजिक क्षेत्रातील कामगिरी पाहून व प्रत्येक क्षेत्रातील प्रशासनाचा सखोल अभ्यास या बाबींचा आढावा घेऊन करण्यात आली येत्या जुलै महिन्यात असलेल्या राष्ट्रीय बोर्ड कमिटीच्या परिषदेस सुरज नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
मानवता जोपासत नेहमी मानवी हक्कासाठी लढा देण्यात येईल व राज्यातील सर्व क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, खासगी अशा विविध ठिकाणी जेथे मानवी घटकाचा समावेश असेल त्या प्रत्येक ठिकाणी मानवाधिकार परिषद अध्यक्ष या नात्याने न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही सुरज नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.