जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत सासर असलेल्या विवाहितेला माहेरहुन साडे चार लाख रूपये आणावे यासाठी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीत गायत्री चेतन कोळी आणि त्यांचे पती चेतन शांताराम कोळी हे वास्तव्याला आहे. सोबत सासू आणि नणंद देखील राहतात. सोमवारी १८ जुलै रोजी विवाहिता घरात असतांना सासू आणि पती यांनी विवाहितेला नणंद हीच्या घरी जाण्यास सोबत जाण्याचे सांगितले. विवाहितेने सोबत जाण्यास नकार दिल्याने पती चेतन कोळी आणि सासू यांनी शिवीगाळ करून विवाहितेला मारहाण केली. तसेच यापुर्वी पती चेतन कोळी याने लग्नात खर्च झालेले ४ लाख ५० हजार रूपये माहेरहून आणावे अशी मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला होता. या छळाला कंटाळून रागाच्या भरात घरातील हारपीक औषध पिऊन घेतले. तिला विवाहितेला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती चेतन शांताराम कोळी, सासू कल्पना शांतराम कोळी आणि नणंद प्रियंका चेतन कोळी सर्व रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.