जळगाव ( प्रतिनिधी ) – आज कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांच्या सपत्नीक महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवजन्मोत्सव सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनींनी सादर केले या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पथक व झेंडा सादर केली शाळेतील सर्व मान्यवर व शिक्षक वृंद सहभागी होते शिवजयंती निमित्ताने कुंसुंबा दत्तमंदीर येथे अल्पदरात शासकिय योजना शिबीर(अभियान) राबविण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे , इश्वर पाटील , वसंत पाटील ,शैलेश साळुंखे , रविंद्र कोळी, विजय सोनार, निर्मल पाटील ,गणेश पाटील ,राजेंद्र पाटील ,भरत महाजन , योगेश घुगे , मुकेश पाटील ,किरण राजपुत व समस्त शिवभक्त उपस्थित होते.