जामनेर ( प्रतिनिधी ) – आज जामनेर शहरात आमदार गिरीष महाजन व नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते सकाळी राजमाता जिजाऊ चौकात व नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जामनेर तालुका एजूकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बावीस्कर, बाबूराव हिवराळे, नाना वाणी, उल्हास पाटील, शेख रिजवान, खलील भांजा,अतिश झाल्टे यांच्यासह डॉ. संजीव पाटील, जे के चव्हाण, बाबूराव गवळी, शंकर राजपूत, कैलास पालवे, सुभाष पवार, दत्तू काळे, विनोद माळी, डॉ. बाजीराव पाटील, नितीन झाल्टे, आबासाहेब पाटील, भगवान शिंदे, शेख इम्रान, विशाल महाजन, गणेश चौधरी, समाधान राजूरकर यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
दुसऱ्या एका कार्यक्रमात सोन बर्ड्डीच्या पायथ्यापासून सुरू झालेले मोटार सायकल रॅली संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करीत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप करण्यात आला.