जळगाव ( प्रतिनिधी ) – सरकारी गावठाणाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधले म्हणून तालुक्यातील चिंचोली येथील उपसरपंच प्रवीण धुमाळ यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे
तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी चिंचोलीचे उपसरपंच प्रविण धुमाळ यांचेविरुद्ध सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने अपात्र करणेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता,जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांचे कडुन चौकशी अहवाल मागवला होता. या अहवालावर तक्रारदारांनी हरकत घेतली होती.
जिल्हाधिकारी यांनी प्रविण धुमाळ यांने ग्रा.पं. सरकारी गावठाण जागेत स्वतःसह आई वडील आणि भावाच्या नावे अतिक्रमण केले असल्याने त्यांना ग्रा.पं. सदस्यपदी अनर्ह ठरविण्यात येत आहे , असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
त्यांचे ग्रा. पं. नमुना न. 8 ला मिळकत व अ. क्र. 739, 735 ला असलेले अतिक्रमणे त्यांनी स्वखर्चानि तात्काळ निष्कासित करण्याचा आदेश ग्रा.पं.ला देण्यात आला आहे. त्यांची दुमजली इमारत पडली जाणार आहे तक्रारदारातर्फे अँड. वसत एस.भोलाणकर, अंड, विजय पाटील यांनी काम पाहीले.