जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नशीराबाद येथे गावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी सोमवार, १८ एप्रिल रोजी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील नशीराबाद गावात सोमवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर नशीराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळ गाठले व पाहणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयताचे अंदाजे वय ६० असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंके करीत आहेत.