• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जादा पैसे उकळणाऱ्या डॉक्‍टरांवर लक्ष ठेवा – गृहमंत्री वळसे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2021
in महाराष्ट्र
0

मंचर (वृत्तसंस्था) – शिनोली, अवसरी खुर्द येथील कोविड सेंटरची क्षमता वाढवावी. करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून खासगी डॉक्‍टर जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.18) केली.

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये तालुक्‍यातील करोना रुग्णांची स्थिती आणि उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी मुंबई येथून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तर पुण्यातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर ऑनलाइन सहभागी झाले होते.

मंचर येथील सभागृहात शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर, उपअभियंता प्रकाश शेडेकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. अंबादास देवमाने, प्राचार्य के. जी. कानडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, फक्‍त पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजे. करोना रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडता कामा नये. करोनाची स्ट्रेन्थ पॉवरफुल आहे. परिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. प्रत्येकाने काळजी घेतल्यास करोनाला हद्दपार करू शकतो. त्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांचा समन्वय हवा असून त्या पद्धतीने काम केल्यास करोनावर मात करणे शक्‍य आहे.

देवदत्त निकम म्हणाले की, आंबेगाव तालुक्‍यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हेल्पलाइन सुरू करावी. त्या माध्यमातून खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेडची स्थिती समजेल. तसेच रेमडेसिविर इंजेक्‍शन खासगी हॉस्पिटलवाले रुग्णांना बाहेरुन आणण्यासाठी सांगत असल्याने ते रोखणे गरजेचे असून खासगी रुग्णालयातच इंजेक्‍शन मिळेल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. मोहन साळी, भुषण साळी, डॉ. श्रीरंग फडतरे, डॉ. रजनीश पोतनीस, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने चर्चेत भाग घेत समस्या मांडल्या.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची भाजपवर टीका

Next Post

मारहाण करून साकेगावच्या शेतकऱ्याला लुटले ; हजारॊचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मारहाण करून साकेगावच्या शेतकऱ्याला लुटले ; हजारॊचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon